Breaking News

सिंगलफेज लाईटच्या कामाचे अविनाश पालवे यांच्या हस्ते उद्घाटन


पाथर्डी/प्रतिनिधी: शिरसाटवाडी येथे सिंगलफेज लाईटच्या कामाचे उद्घाटन मनसे परिवहन कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश पालवे यांच्या हस्ते करण्यात आले. सिंगलफेज लाईट द्या या मागणीसाठी अविनाश पालवे बर्‍याच वर्षापासून पाठपुरावा करत होते. आणि आज या पाठपुराव्याला यश आले आहे.

5 फेब्रूवारी 2019 रोजी सिंगलफेजच्या मागणीसाठी अविनाश पालवे यांच्या नेतृत्वाखाली औरंगाबाद-बारामती मार्गावर शिरसाटवाडी फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनामधे तहसीलदार नामदेव पाटील यांच्यासमोर महावितरणचे उपकार्यकारी अभियंता निलेश मोरे यांनी 1 मार्च रोजी सिंगलफेजचे काम सुरू करू असे लेखी आश्‍वासन दिले होते. त्यानुसार आज काम सुरू झाले.

यावेळी बोलताना अविनाश पालवे म्हणाले की, या भागाला सिंगलफेजची खुप आवश्यकता होती. या मागणीसाठी गेल्या 4-5 वर्षापासून निवेदन, विविध आंदोलनांच्या माध्यमातून पाठपुरावा करत होतो अगदी एक महिन्यापूर्वी रास्ता रोको आंदोलनही करावे लागले होते.

यावेळी महावितरणचे उपकार्यकारी अभियंता निलेश मोरे, सहाय्यक अभियंता वैभव सिंग, राजु पालवे, तुषार शिरसाट, अंकुश शिरसाट, अशोक फुंदे, संदीप शिरसाट, देविदास डमाळे, नामदेव खाडे, रामनाथ खाडे, अभिषेक शिरसाट, बाबु शिरसाट, अशोक शिरसाट, नवनाथ ढाकणे, किशोर शिरसाट, अमोल शिरसाट, शुभम बांगर, निलेश सानप, शिवाजी कुटे, किरण शिरसाट यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.