Breaking News

भाजप सरकारने चार वर्षात एकही ठोस काम केले नाही- इंद्रजीत थोरा


संगमनेर/प्रतिनिधी : देशाच्या एकात्मता व अखंडतेसाठी काँग्रेसच्या नेत्यांनी बलिदान केले आहे. मागील 70 वर्षात समाजातील सर्व घटकांना बरोबर घेत विकास साधला आहे. मोठ मोठ्या भूलथापा देवून सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने चार वर्षात एकही ठोस काम केले नसून मोदी सरकारने जनतेला फसविले असल्याची टीका इंद्रजीत थोरात यांनी केली आहे.

चंदनापुरी येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (आय), राष्ट्रवादी काँग्रेस व आघाडीचे शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांची बैठक पार पडली. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी समवेत व्यासपीठावर जिल्हा परिषद सदस्य आर.एम.कातोरे, मिलिंद कानवडे, उपसभापती नवनाथ अरगडे, राजहंसचे संचालक आर.बी.राहणे, कारखाना संचालक रमेश गुंजाळ, गणपतराव सांगळे, राजहंसचे संचालक संतोष मांडेकर, नगरसेवक हिरालाल पगडाल, शांताराम कढणे, भाऊसाहेब कढणे, आनंदराव कढणे, सरपंच सुनिता रहाणे, कैलास सरोदे आदी मान्यवर उपस्थित होते. 

यावेळी थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजित थोरात म्हणाले की, मोदी सरकारने मोठी आश्‍वासने देत शेतकरी व सामान्य माणसाला फसवले. त्यामुळे ग्रामीण भागात या सरकार विरोधात मोठा असंतोष आहे. या सरकारने कोणतीही ठोस कामे केली नाही. काँग्रेसच्या काळातील योजनांची नावे बदलून त्याच योजना सुरु ठेवल्या. नोटाबंदीचा निर्णय हा पुर्णपणे फसला असून सर्व सामान्य माणसाला त्याचा खूप त्रास झाला. छोटे व्यापारी तोट्यात गेले. शेतीमालाचे बाजार कोसळले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

याप्रसंगी विजय राहणे, अभिषेक कढणे, विलास यंधे, जगनराव नेहे, काशिनाथ नेहे, भागवत नेहे, नाना रहाणे, राजेंद्र भालेराव, सूखदेव भालेराव, सिताराम रहाणे, नानासाहेब रहाणे, गोपीनाथ कढणे, एकनाथ रहाणे, विलास रहाणे, जयसिंग सरोदे, पंढरीनाथ रहाणे, राजेंद्र कढणे, मंगला रहाणे, रवी नेहे, रंगनाथ फापाळे, राजेंद्र गोसावी, साहेबराव सातपुते, संतोष रहाणे, सोपानराव वाकचौरे उपस्थित होते.