दिल्लीत गळाभेट आणि चीनमध्ये झुकणे; राहुल गांधी यांचा आरोप; जिनपिंगसमोर मोदी यांचे कायमच मौन


नवीदिल्लीः संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत मसूद अजहरला जागतिक दहशतवादी घोषित करण्याच्या प्रस्तावात चीन वारंवार आडकाठी घालत आहे. यावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी देशाच्या परराष्ट्र नीतीवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले आहेत. मोदी कमजोर आहेत आणि ते चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांना घाबरले आहेत, असा टोला राहुल यांनी लगावला आहे. 

चीनने वारंवार आडकाठी आणल्याने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतून मसूद अजहरला जागतिक दहशतवादी घोषित करण्याची याचिका फेटाळली जात आहे. मसूद अजहर प्रकरणी चीनने स्वत:च्या मतदान अधिकाराचा वापर करुन या प्रस्तावाला नकार दिला आहे. 14 फेब्रुवारी रोजी पुलवामा येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर भीषण दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले होते. ‘जैश-ए-मोहम्मद’ संघटनेने आत्मघातकी दहशतवाद्याचा व्हिडिओ प्रसिद्ध करून या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. यानंतर भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘जैश-ए-मोहम्मद’ आणि पाकिस्तानची कोंडी करायला सुरुवात केली होती; पण चीनने मसूद अजहरच्या प्रस्तावा विरोधात नकाराधिकार वापरला. असे करण्याची चीनही ही काही पहीलीच वेळ नाही. 2009, 2016 आणि 2017 लाही चीनने हे प्रयत्न केले आहेत. कमजोर मोदी चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांना घाबरले आहेत. जेव्हा चीन भारत विरोधी कोणती भूमिका घेतो, तेव्हा मोदींच्या तोंडून एकही शब्द निघच नाही. मोदी गुजरातमध्ये जिनपिंग यांच्यासोबत झोपळ्यावर झोका घेतात. दिल्लीमध्ये जिनपिंग यांची गळाभेट घेतात आणि चीनमध्ये त्यांच्यासमोर झुकतात असेही राहुल यांनी म्हटले आहे.

परराष्ट्र धोरणाचे अपयश

काँग्रेस नेते रणदीपसिंह सुरजेवाला यांनी या घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर ट्विटरवरुन प्रतिक्रिया दिली. आज पुन्हा एकदा दहशतवादाविरोधातील लढ्यात पाकिस्तान- चीनने हादरा दिला. 56 इंचाच्या छातीचे मिठी मारण्याचे धोरण आणि अहमदाबादमधील साबरमतीच्या किनार्‍यावर झोपाळ्यावर बसून झोका घेतल्यानंतरही चीन- पाकिस्तानची जोडी भारताकडे लाल डोळे वटारून पाहत आहे. यातून मोदी सरकारचे अपयशी परदेश धोरण पुन्हा एकदा दिसते, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget