परम विशिष्ठ सेवापदक लष्करप्रमुख रावत यांना प्रदान


नवी दिल्ली: लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांना शांतता काळात आणि सेवा क्षेत्रातील असाधारण कामगिरीबद्दल दिल्या जाणार्‍या ‘परम विशिष्ट सेवा पदका’ने आज, गुरूवारी गौरवण्यात आले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते रावत यांना हे पदक प्रदान करण्यात आले.

राष्ट्रपती भवनात हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. लष्करप्रमुख रावत यांच्यासह लष्कराच्या अन्य 18 वरिष्ठ अधिकार्‍यांना परम विशिष्ट सेवा पदकाने गौरवण्यात आले. त्यात 15 लेफ्टनंट जनरल आणि तीन मेजर दर्जाचे अधिकारी आहेत. लष्कराच्या अन्य दोन अधिकार्‍यांना किर्ती चक्र देण्याचा निर्णय संरक्षण मंत्रालयाने घेतला आहे. 22 व्या राष्ट्रीय रायफल्सचे सोवर विजय कुमार यांना मरणोत्तर, तर जाट रेजिमेंटचे मेजर तुषार गौबा यांना हा सन्मान दिला जाणार आहे, तर सीआरपीएफचे जवान प्रदीप कुमार पांडा आणि राजेंद्र कुमार नैन यांनाही (मरणोत्तर) किर्ती चक्र देण्यात येणार आहे. लष्कराच्या नऊ अधिकार्‍यांना शौर्य चक्रने सन्मानित करण्यात येणार आहे.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget