Breaking News

मुंबईच्या धर्मादाय आयुक्तांची नटराज मंदिरास सदिच्छा भेट


सातारा, (प्रतिनिधी) : येथील श्री उत्तर चिदंबरम नटराज मंदिरास मुंबईचे धर्मादाय आयुक्त आशुतोष करमरकर व त्यांच्या सुविद्य पत्नी यांनी नुकतीच सदिच्छा भेट दिली. सातारा येथील नियोजित कार्यक्रमासाठी श्री. करमरकर आले असताना त्यांनी सातार्‍याचे धर्मादाय आयुक्त ईश्र्वर सुर्यवंशी यांच्याशी नटराज मंदिराबाबत आपणास विशेष औत्सुक्य असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी सपत्नीक नटराज मंदिराला भेट दिली तसेच विविध देवदेवतांचे दर्शन घेतले. 

श्री उत्तर चिदंबरम नटराज मंदिर ट्रस्टच्या वतीने गेली अनेक वर्षे राबविण्यात येत असलेल्या धार्मिक तसेच विविध सामाजिक उपक्रमांची माहिती त्यांना मंदिराचे विश्र्वस्त मुकूंद मोघे, के.नारायणराव यांनी दिली. मंदिर परिसरातील 108 कर्ना शिल्पाकृती, श्री गणेश, राधाकृष्ण, अंजनेय, श्री उमादेवी, श्री मुलनाथेश्र्वर, नवग्रह मंडल व अय्यप्पा मंदिरांचे दर्शन घेतल्यावर करमरकर यांचा मंदिर समितीतर्फे शाल, श्रीफळ व महाप्रसाद देवून सत्कार करण्यात आला. यावेळी मंदिर समितीच्या मार्गदर्शिका सौ. उषा शानभाग, सौ. आँचल घोरपडे, रमेश हलगेकर, राहूल घायताडे, व्यवस्थापक चंद्रन यांची उपस्थिती होती.