Breaking News

कासारशिरंबे शाळेत कवी आपल्या भेटीला कार्यक्रम


वाठार / प्रतिनिधी : कासारशिरंबे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घेण्यात आलेल्या कवी आपल्या भेटीला या कार्यक्रमास विद्यार्थी व शिक्षकांमधून उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला.

महाराष्ट्रकवी यशवंत यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून कवी उमेश सुतार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कविसंमेलनाचा उपक्रम घेण्यात आला. या संमेलनाचे उद्घाटन शाळेचे वरिष्ठ मुख्याध्यापक प्रकाश कोळेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी शिक्षक गोरखनाथ कुंभार, नारायण सातपुते, उपशिक्षिका मंदाकिनी वाघमारे, हेमलता पाटील, जयश्री साळुंखे, सचिन रसाळ, मुकूंद पन्हाळे, मर्‍याप्पा कांबळे, स्वाती शिंगण आदींची उपस्थिती होती,

या कवी संमेलनामध्ये कवी उमेश सुतार यांचेसमवेत शाळेतील बालकवी जान्हवी यादव, सार्थिका माने, संचित गरगटे, श्रेया पाटणकर, चंदना मोरे, सायली पोकळे, पवन यादव, शंभू शिंदे, श्रुती गायकवाड, तन्वी पाटील, निकीता दळवी, दिव्या माने, विश्र्वजीत पाटील, आदीराज पाटील, अक्षद यादव यांनी उत्कृष्ठ कविता सादर करून शाळेतील शिक्षक तसेच बालचमुंचे मनोरंजन केले.