Breaking News

आव्हाड यांच्या प्रचारासाठी जिल्हा दौरा


अहमदनगर/प्रतिनिधी : येथील नगर दक्षिण लोकसभा मतदार संघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सुधाकर आव्हाड यांच्या निवडणूक प्रचार नियोजनासाठी दि. 30 मार्च ते 4 एप्रिल या कालावधीत अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघातील तालुक्यांचा दौरा आयोजित करण्यात आला आहे’’, अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते प्रा. किसन चव्हाण यांनी दिली. 

या दौर्‍याच्या नियोजनासाठीची प्राथमिक बैठक नुकतीच प्रा. किसन चव्हाण यांच्या निवासस्थानी पार पडली. यावेळी उमेदवार सुधाकर आव्हाड, वंचित बहुजन आघाडीचे अहमदनगर दक्षिण जिल्ह्याचे निमंत्रक अ‍ॅड. अरुण जाधव उपस्थित होते. 

शुक्रवारी (दि. 30) सकाळी 11 वाजता शेवगाव येथील बैठकीपासून या दौर्‍यास प्रारंभ होणार आहे. दुपारी 4 वाजता पाथर्डी, रविवार (दि. 31) सकाळी 11 वाजता जामखेड, दुपारी 4 वाजता कर्जत, 1 एप्रिलला सकाळी 11 वाजता श्रीगोंदा तर 4 एप्रिलला सकाळी 11 वाजता राहुरी येथे वंचित बहुजन आघाडी, भारिप बहुजन महासंघ व एम.आय.एम. च्या कार्यकर्त्यांच्या बैठका तसेच त्या त्या मतदार संघातील मतदारांच्या भेटीगाठी व संपर्क अभियान होणार आहे. 

वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते प्रा. किसन चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली होणार्‍या या निवडणूक प्रचार नियोजन व संपर्क अभियानात भारिप बहुजन महासंघाचे नगर दक्षिण जिल्हाध्यक्ष अशोक सोनवणे, महासचिव सुनील शिंदे, वंचित बहुजन आघाडीचे नगर दक्षिणचे निमंत्रक अ‍ॅड. अरुण जाधव, महासचिव प्रकाश भोसले, नगर उत्तर जिल्ह्याचे निमंत्रक डॉ. जालिंदर घिगे, महासचिव सुनील शिरसाठ, एमआयएमचे डॉ. परवेज अशरफी मार्गदर्शन करणार आहेत.