Breaking News

गो. से. महाविद्यालयाला राष्ट्रीय मूल्यांकन, प्रत्यायन कमिटीची भेट


खामगाव,(प्रतिनिधी): येथील गो. से. महाविद्यालयाला राष्ट्रीय मूल्यांकन व प्रत्यायन कमिटी नॅक पिअर टीमने नुकतीच भेट दिली. बंगळुरू स्थित असलेल्या या नॅक पिअर टीमने 7 ते 8 मार्च असे दोन दिवस महाविद्यालयाचे सर्वांगीण परीक्षण केले. उच्च शिक्षणाची गुणवत्ता निर्धारण करण्याच्या हेतूने महाविद्यालयातील विविध उपक्रमांची माहिती घेतली. यावेळी महाविद्यालय राबवत असलेल्या विविध उपक्रमाची प्रत्यक्षात पाहणी नॅक टीम ने केली. गो. से. महाविद्यालयात कंपोस्ट खत निर्मिती, जलसंधारण प्रकल्प, सौरऊर्जा, फ.ड. प्लॉन्ट, जिम्नॅस्टिक, बॅडमिंटन हॉल, भव्य स्वीमिंग पूल, क्रीडांगण, वनस्पतीशास्त्र विभागामार्फत बर्ड हेवन प्रकल्प, महिला सक्षमीकरण व उद्योजकता विकास समिती, गर्ल्स कॉमन रूम, या सोबतच मध्यवर्ती कार्यालयाचे प्रशासन, भव्य अत्याधुनिक ग्रंथालय,पार्किंग व्यवस्था, सिक्युरिटी व्यवस्था, मुक्त विद्यापीठ केंद्र, करिअर सेल, विविध अभ्यासक्रम, निसर्गरम्य परिसर, वृक्षसंवर्धन व संगोपन निसर्ग अभ्यासिका, विद्यार्थ्यांना साठी असलेली मोफत इंटरनेट सुविधा, ग्रंथालय, 16 तास उघडे असलेले वाचन कक्ष, महाविद्यालयाची शिस्त, समाजसेवा उपक्रमाचा भाग असलेले एन.एस.एस. पथक, एन. सी. सी. पथक, प्लास्टिक मुक्त परिसर, सांस्कृतिक कार्यक्रम, प्राध्यापकाचे, संशोधक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, महाविद्यालयातील विविध विभाग व त्यांच्या कार्यपद्धती, ट्युटर वॉर्ड, गरीब विद्यार्थ्यांना मदत विविध विषयातील पारितोषिके प्रेरणा, विद्यार्थ्यांची गुणवत्ता, महाविद्यालयाचे सामाजिक योगदान अशा विविध पैलूचे, उपक्रमाचे प्रकल्पाचे प्रशिक्षणात्मक निरीक्षण पिअर टीम ने केले आहे. दोन दिवसाच्या या भेटीत माजी विद्यार्थी व पालक मेळाव्यातून महाविद्यालयाबाबतचे मते जाणून घेतली. माजी विद्यार्थ्यांशी संवाद साधून माहितीचे अवलोकन केले. स्वच्छ महाविद्यालय व भव्य परिसर उपक्रम व्यवस्थापन, सुसंवादी वातावरणाचे निरीक्षण करून नॅक पिअर टीमने समाधान व्यक्त केले. ग्रामीण भागतील महाविद्यालयाची ही भव्यता, विविध अभ्यासक्रमांची केलेली व्यवस्था त्यातील उत्तम प्रशासन व महाविद्यालयाचे सामाजिक योगदान, बघता प्रत्यक्षदर्शी परीक्षणातून महाविद्यालयाने हाती घेतलेल्या विविध उपक्रमाबाबत व राबवलेल्या प्रकल्पा बाबत समाधान व्यक्त केले. या भेटीचा परीक्षण अहवाल येत्या काही दिवसात मिळणार आहे. यावेळी संस्थेचे अध्यक्ष सुभाषराव बोबडे, उपाध्यक्ष अशोक झुनझुनवाला, सचिव डॉ. प्रशांत बोबडे, अजिंक्य बोबडे, राजेंद्र झांबड, प्रकाश तांबट, अ‍ॅड.अनिल व्यास, प्रमोद अग्रवाल, प्राचार्य डॉ. डी. एस. तळवणकर, कदअउ समन्वयक प्रा. डॉ. हेमंत चांडक, ्व प्राध्यापक व कर्मचारी यांनी पिअर टीम ला निरोप देताना उपस्थित होते.