Breaking News

आगाशिवनगर येथे अज्ञाताने पेटवले दुकान


कराड (प्रतिनिधी) - आगाशिवनगर ता. कराड येथे फिनिक्स एंटरप्रायजेस दुकानाचे शटरचे ग्रीलमधून आत रॉकेल ओतून अज्ञातांनी दुकान पेटवून दिल्याची घटना शुक्रवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबतची फिर्याद अमोल गजानन टकले यांनी शहर पोलिसात दिली असून याप्रकरणी अज्ञातावर गुन्हा नोंद झाला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अमोल टकले यांचे आगाशिवनगर वृंदावन कॉलनी येथे फिनिक्स एंटरप्रायजेस नावाचे दुकान आहे. शुक्रवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास अज्ञातानी दुकानचे शटरमधून रॉकेल आत ओतून दुकान पेटवून दिले. यामध्ये कॉम्प्युटर, प्रिंटर, स्कॅनर, लाईट बोर्ड वायरींग असे सुमारे 35 हजार रूपयांचे नुकसान झाले. याबाबतची फिर्याद टकले यांनी दिली असून याप्रकरणी अज्ञातावर गुन्हा नोंद झाला आहे.