Breaking News

डिस्कळच्या सरपंचपदी महेश पवार


पुसेगाव / प्रतिनिधी : संपूर्ण खटाव तालुक्याचे लक्ष लागून राहीलेल्या डिस्कळ निवडणुकीचा गड राष्ट्रवादीने राखला. सरपंचपदाची निवडणुक अत्यंत चूरशीची झालेली पाहायला मिळाली. राष्ट्रवादीच्या महेश पवार यांनी 1395 मते मिळवत सागर मदने यांचा निसटता पराभव केला. अवघ्या 10 मतांनी विजय हुकलेल्या सागर मदने यांनी 1385 मते घेत निखरीची लढत दिली तर अपक्ष उमेदवार अमोल निकम यांनी 410 इतकी आर्श्चयकारक मते मिळवली. तर जोर्तिलिंग ग्रामविकास पॅनेलचे सहा उमेदवार विजयी झाले तर परीवर्तन पॅनेलचे चार उमेवार विजयी झाले सचिन माने यांची बिनविरोध निवड झाली.

 कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील महत्त्वाची ग्रामपंचायत असणार्‍या डिस्कळ ग्रामपंयातीचा गड राखण्यासाठी राष्ट्रवादीने मोठी ताकद लावली होती आमदार शशिकांत शिंदे यांनी लक्ष घातल्याने ही निवडणुक प्रतिष्ठेची झाली होती. जेष्ठनेते लवकुमार मदने यांनी परीवर्तन पॅनेलच्या माध्यमातुन मोठे आव्हान उभे केल होते.