Breaking News

खेडच्या गांधी महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरणकर्जत/प्रतिनिधी
कर्जत तालुक्यातील खेडच्या राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालयाचे वार्षिक पारितोषिक वितरण व तृतीय वर्ष सदिच्छा समारंभ उत्साहात संपन्न झाला. माजी आमदार व युवक क्रांती दलाचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला.
सामाजिक कार्यकर्त्या रामेश्‍वरी जाधव, प्राचार्य डॉ.एन. बी. मुदनुर, सुजाता शेळके, माजी पंचायत समिती सदस्य आण्णासाहेब मोरे, प्रा.संदीप काळे हे मंचावर उपस्थित होते.
प्रास्ताविक प्राचार्य डॉ.एन.बी.मुदनुर यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रम समन्वयक प्रा.संदीप काळे यांनी विभागनिहाय अहवालांचे वाचन केले.
महाविद्यालयात आयोजित वक्तृत्व, निबंध, रांगोळी, मेहंदी, गीतगायन तसेच विविध क्रीडा स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात आले.तृतीय वर्षातील माधुरी विजय चव्हाण हिला बेस्ट स्टुडंट् ऑफ द ईयर, संदीप मारुती कांबळे याला बेस्ट एनएसएस हॉल्यूनटियर, ज्ञानेश्‍वर तुळशीराम भोई याला बेस्ट स्पोर्ट्स प्लेयर वार्ड देवून गौरविण्यात आले. रामेश्‍वरी जाधव यांनी संस्थेच्या माध्यमातून मूकबधिरांसाठी उभारलेल्या कामाची माहिती दिली. डॉ. कुमार सप्तर्षी यांचे सामाजिक कार्य युवकांसाठी प्रेरणादायी आहे. या संस्थेत शिकणार्‍या विद्यार्थ्यांसाठी हे भूषणावह बाब असल्याचे जाधव यावेळी बोलताना म्हणाल्या.
या कार्यक्रमासाठी डॉ.धर्मेंद्र साळवे, आतिश नाईकवडे, चंद्रकांत काटे, सुनंदा मोरे, रुपचंद गोळे, प्रा.किरण जगताप, मुख्य लिपिक भगवान काळे, अंकुश शेटे, माऊली जंजिरे आदी शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.

मायभूमीशी नाळ जोडा
उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींची इतिहास दखल घेतो. विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या क्षेत्रात यश संपादन करावे. मायभूमीशी नाळ जोडून विविध क्षेत्रांमध्ये लौकिक प्राप्त करण्यासाठी प्रयत्नशील रहावे असे आवाहन डॉ. कुमार सप्तर्षी यांनी अध्यक्षीय भाषणातून केले.--डॉ. कुमार सप्तर्षी