Breaking News

आ.शंभूराजे देसाईंच्या ताकदीत नरेंद्र पाटलांच्या माथाडीची भर
सातार्‍यात शिवसेना होणार का वरचढ?
मोरगिरी / किशोर गुरव : पाटणचे शिवसेनेचे आ.शंभूराज देसाई यांनी गत पाच वर्षात संपूर्ण विकासाचा आक्रमक झणझावत कायम सुरू ठेवत देसाई गटाबरोबर शिवसेनेची ताकद मोठ्या प्रमानात वाढविली आहे. आता शंभूराजेंच्या ताकदीत पाटलांच्या माथाडीची भर पडल्याने शंभूराजे सातार्‍यातील शिवसेनेचे एकमेव आमदार म्हणून जिल्ह्यातील सर्वच शिवसैनिकांची एकसंध मोठ बांधण्याचा प्रयत्न करीत आहत. नरेंद्र पाटील यांना शिवसेनेचे खासदार करण्यासाठी ताकद पणाला लावून शिवसेना जिल्ह्यात वरचढ करुन येणार्‍या विधानसभेसाठी पाटणमध्ये आपला स्वतःचा विजय अगदीच सोपा करुन ठेवणार का? की गत दोन लोकसभेच्या निवडणुकीची पुनरावृत्ती करून युतीधर्म डावलतील का? की नरेंद्र पाटलांना खासदार करण्यामध्ये सिंहाचा वाटा उचलून आपल्या कर्तुत्वाची अधिकच छाप पक्षप्रमुखांनकडे उंचावतील का? अशा अनेक प्रश्र्नांसह चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत. लोकसभेचे बिगुल वाजल्यापासून सातारा जिल्ह्यातही चांगलेच राजकीय घमासान सुरू झाले आहे.सातारा लोकसभेच्या जागेवर गत दोन निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उदयनराजे भोसले यांनी निर्विवाद वर्चस्व राखले होते. परंतु गत दोन लोकसभेच्या निवडणुकीपेक्षा सद्यः होत असलेली लोकसभेची निवडणुक ही आघाडीचा बालेकिल्ला असलेल्या पश्र्चिम महाराष्ट्रात कॉँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीला निश्र्चितच अवघड जाणार अशी शक्यता असल्याचे सर्वच राजकीय जाणकारांमधून ऐकायला मिळत आहे. त्यातच सातारा लोकसभेसाठी शिवसेना कोणाला उमेदवारी देणार यावर सर्वांचेच लक्ष वेधून राहिले होते. दोनच दिवसापुर्वी कोल्हापूर येथे शिवसेना-भाजप युतीच्या प्रचाराचा फुटलेला नारळ यानिमित्त आयोजित केलेल्या जाहीर सभेत माथाडीचे आराध्य दैवत कै.अण्णासाहेब पाटील यांचे व पाटण तालुक्याचे सुपुत्र अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश करुन शिवसेनेकडून सातारा लोकसभेसाठी उमेदवारी मिळवली आहे. नरेंद्र पाटील यांचा शिवसेना प्रवेश म्हणजे पाटण तालुक्याच्याच नव्हे तर सातारा जिल्ह्यातील माथाडीं बरोबर शिवसैनिकांना दुधात साखर पडल्यासारखे नक्कीच झाले असणार आहे. सातारचे खाजदार उदयनराजे भोसले यांनी गत दहा वर्षात विकासा बाबत कधी चर्चा केली नाही आणि विकासही केला नाही. एवढेच नव्हे तर ग्रामीण भागात गेल्या पाच वर्षात मतदान प्रचारासाठी आले होते आणि त्यावर आत्ता येतील अशा प्रतिक्रिया सर्वसामान्य जनतेतूंन उमटत असल्याने उदयनराजे यांची भलेही युवकांमध्ये क्रेझ असेल पण सर्वसामान्यांमध्ये ती कमी झालेली दिसून येत आहे. आपल्या सोयीनुसार वेगवेगळ्या पक्षांच्या वेगवेगळ्या व्यासपीठावर वेगवेगळे बोलणे एकंदरित उदयनराजेंनची खासदारकी सातारा लोकसभा मतदारसंघासाठी गत दहा वर्षात किती पोषक आहे, हेे सर्वसामान्य जनतेला कळून चुकले आहे तर दूसरीकडे माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी पाटण तालुक्या बरोबर सातारा जिल्ह्यातील अनेक सर्वसामान्य कुटुंबाना माथाडीच्या माध्यमांतून आर्थिक स्थिरता मिळवून दिली आहे. गत पाच वर्षात विधान परिषदेच्या सदस्यपदाचा वापर करत विकासही साधण्याचा प्रयत्न केला आहे , तर अण्णासाहेब आर्थिक विकास मंडळाच्या माध्यमांतून बेरोजगार युवकांसाठी उद्योग उभे करण्यासाठी बँकांनी कर्जपुरवठा करावा यासाठी जातीने लक्ष देत प्रत्येक तालुक्यात बँकेच्या व प्रशासकीय अधिकार्‍यांच्या बैठका घेऊन युवकांच्या अडचणी सोडवण्यासाठी सुरू असलेली धडपड या नरेंद्र पाटलांच्या जमेच्या बाजू आहेत. पाटणचे आ.शंभूराज देसाई यांचे उदयनराजे भोसलेे यांच्याबरोबर मैत्रीचे संबध असले तरी ते नरेंद्र पाटलांच्या शिवसेनेच्या उमेदवारीसाठी त्यांनी त्यांचे मैत्रीचे संबध बाजूला ठेऊन माथाडी नेत्यांला मदत गरजेचे आहे आणि तसे न झाल्यास येणार्‍या विधानसभेत पाटण तालुक्यातील माथाडींचा वारु मग रोखायचा कोणी, हा प्रश्र्न शंभूराजेंच्या समोर नक्कीच उभा राहील. एकंदरीत सातारा लोकसभेवर नरेंद्र पाटलांच्या रूपाने मिळालेले दणकेबाज उमेदवार असले तरी त्यांच्यापाठीमागे कोण किती ताकद लावणार त्यावरच त्यांचे राजकीय भवितव्य अवलंबनू आहे.