Breaking News

चापडगाव विद्यालयात जागतिक महिला दिन साजरा.चापडगाव/प्रतिनिधी
चापडगाव माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. विद्यालयाचे प्राचार्य निवृत्ती भांगरे, उपमुख्याध्यापक अशोक निकाळजे, पर्यवेक्षक शेषराव तहकीक, प्रतिमा उकिर्डे, अंजली कुलथे, विद्यावर्धिनी मुळे, अमृता देशमाने, पल्लवी झिरपे यांच्या हस्ते प्रतिमांचे पूजन करण्यात आले.

याप्रसंगी महिलांचा प्राचार्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी इयत्ता पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी स्त्रियांचा गुणगौरव व त्यांचे अलौकिक कार्य याविषयी अप्रतिम माहिती सांगितली. तसेच प्रा सखाराम घावटे, आप्पासाहेब ढगे, राम काटे, अंजली कुलथे यांनी भारतीय संस्कृती स्त्रियांमुळे सौंदर्याने नटलेली आहे. असे मौलिक मार्गदर्शन त्यांनी आपल्या भाषणातून केले.
यावेळी बोलताना प्राचार्य भांगरे म्हणाले की, स्त्रियांची अंधारातून प्रकाशाकडे जी वाटचाल झाली. त्यामुळेच जगातील प्रत्येक राष्ट्राची उन्नती झाली आहे. एक स्त्री आपल्या भोवती सर्व प्रकारच्या नात्यांना वलय तयार करत असते. त्यामुळेच जगात शांतता, प्रेम, वात्सल्य, समृद्धी, विकास या बाबीं नांदतात. असे प्रतिपादन केले. व सर्व महिला भगिनींना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षा मंदाकिनी खंडागळे यांनी स्त्री-पुरुष समान आहेत. हे पटवून देत असताना व्यवहारातील अनेक दाखले त्यांनी देऊन स्त्रियांचा आपल्या भाषणात गौरव केला.