Breaking News

अंगणवाडीच्या बालविद्यार्थ्यांनी भरवला बाजार


श्रीरामपूर/प्रतिनिधी: तालुक्यातील टिळकनगर येथील अंगणवाडी क्रं . 264, 265, 267 मधील विद्यार्थी वर्गाने अंगणवाडी प्रांगणात बाल बाजार हा अभिनव उपक्रम भरवून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

विद्यार्थी वर्गाला व्यवहार ज्ञान व खरेदी विक्रीचा अभ्यास व्हावा या हेतूने येथील सर्व अंगणवाडीतील सेविका व मदतनीस यांच्या संकल्पनेतून हा बाल बाजार भरवण्यात आला होता. या बाजारत पालक व ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला.यावेळी सायकल रॅली व महिला सभेचेही आयोजन करण्यात आले होते.

या अभिनव उपक्रमाचे सरपंच चांगदेव ढोकचौळे, ग्रामपंचायतीच्या सदस्या सविता बागुल, परवीन शेख, रजिया पठाण, मंगल आवारे, आदींनी कौतुक केले आहे. सायरा शेख, नगमा शेख, राशिदा इनामदार, अर्चना गवारे, लता शेळके, कार्यक्रम यशस्वीततेसाठी परिश्रम घेतले.