Breaking News

वाकिंग स्टिक भेट देऊन महिलादिन साजरापाथर्डी/प्रतिनिधी
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत माजी उपनगराध्यक्ष तथा प्रभाग क्रमांक सातच्या विद्यमान नगरसेविका दिपाली रामनाथ बंग मित्र मंडळाच्यावतीने ज्येष्ठ महिला लताबाई चंद्रकांत दीक्षित यांना चालायला त्रास होत असल्यामुळे सामाजिक भावना जपत वाकिंग स्टिक भेट देऊन महिलादिनाच्या दिवशी एका स्त्रीचे दुःख जाणून त्यांचा त्रास कमी करण्याचा एक आगळावेगळा उपक्रम राबविला.
यावेळी माजी नगरसेवक रामनाथ बंग ताराबाई बंग, शारदा लाटणे, कावेरी लाहोटी, छाया लाहोटी, शोभा लाहोटी, उमा बजाज, तारा लाहोटी, तुळसा लोहिया, नर्मदा बजाज आदी जण उपस्थित होते.