Breaking News

भाई गुजर हे आदरयुक्त व्यक्तिमत्व : आ. पृथ्वीराज चव्हाण


कराड / प्रतिनिधी : जेष्ठ स्वातंत्र्यसेनानी भाई गुजर हे आदरयुक्त व्यक्तिमत्व होते. स्वर्गीय यशवंतराव चव्हाणसाहेब यांच्यासोबत त्यांनी स्वातंत्र्यसंग्रामात बहुमोल काम केले होते. त्यांचा उल्लेख सन्माने व आदराने घरोघरी केला जात असल्याचे माजी मुख्यमंत्री व आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.जी. के. गुजर मेमोरियल चॅरिटेबल ट्रस्टतर्फे आयोजित स्वातंञ्यसेनानी (कै.) गंगाराम केशवराव गुजर तथा भाई गुजर यांच्या जन्मशताब्दी महोत्सवानिमित्ताने आयोजित शेतकरी व युवक मेळाव्यात ते बोलत होते. 

यावेळी माजी आमदार विलासराव पाटील- उंडाळकर, आ. बाळासाहेब पाटील, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. जयकुमार गोरे, आ. आनंदराव पाटील, युवानेते सत्यजितसिंह पाटणकर, डॉ. सुभाषराव जोशी, डॉ. सुभाषराव एरम, भीमरावदादा पाटील, जि. प. सदस्य ऍड. उदयसिंह पाटील, प्रदिप पाटील, मानसिंगराव जगदाळे, निवास थोरात, पंचायत समितीच्या सभापती फरीदा इनामदार, मनोहर शिंदे, अविनाश मोहिते, अशोकराव पाटील-पार्लेकर, धैर्यशिल कदम, सुहास बोराटे, प्रणव ताटे, वैशाली वाघमारे, नगराध्यक्षा निलम येडगे, नंदकुमार डुबल, शिवराज मोरे, पोपटराव साळुंखे, सोमनाथ जाधव, विकास जाधव, राहुल चव्हाण, इंद्रजीत चव्हाण, डी. व्ही. जाधव, सरपंच उषा करांडे, प्रकाशकाका पाटील, विकास करांडे, अविनाशदादा नलवडे, वैजनाथ थोरात, हारूण नाईक, सुमन नांगरे, फत्तेसिंह जाधव, दीपक लिमकर, नगरसेवक विनायक पावस्कर, ऍड. विद्याराणी साळुंखे, नगरसेवक सौरभ पाटील, मोहसिन आंबेकरी, सुहास पवार, शिवाजीराव पवार, वैभव हिंगमिरे, मिनाज पटवेकर, अंजली कुंभार, अशोकदादा पाटील, ऍड. रवींद्र पवार, राजेंद्र यादव, दत्ता पवार, प्रशांत चांदे, गितांजली पाटील, सुनिता पोळ, समिर पटवेकर, प्रशांत खामकर, अविनाश कदम आदी उपस्थित होते. 

 प्रस्ताविक डॉ. अशोकराव गुजर यांनी केले. जनसंपर्क अधिकारी अबुबकर सुतार, आनंदराव जानुगडे सर व विजय माने यांनी उपस्थितांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ऍड. संभाजीराव मोहिते यांनी केले. प्रवीण काकडे यांनी आभार मानले.