Breaking News

स्त्रीशक्ती म्हणजे अमृतवेल- महाडिक


भेंडे/प्रतिनिधी
सहकार महर्षी स्वर्गीय मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेचे जिजामाता पब्लिक स्कुलमध्ये जागतिक महिलादिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून आशा महाडिक उपस्थित होत्या.
लोकनेते मारुतरावजी घुले पाटील ज्ञानेश्‍वर सहकारी साखर कारखाना भेंडे येथे फोन ऑपरेटर म्हणून कार्यरत असलेले अर्जुन महाडिक जे पूर्णतःअंध असून गेले 40 वर्षापासून महाडिक त्यांची सेवा निस्वार्थपने करत आहेत. परिसरातीलच नव्हे तर जिल्ह्यातील अंध विद्यार्थ्यांसाठी ह्या दाम्पत्याचे कार्य व मार्गदर्शन उल्लेखनीय ठरते म्हणूनच जिजामाता पब्लिक स्कुलच्यावतीने महिलादिनानिमित्त त्यांचा विशेष आदर सत्कार करण्यात आला.
आपल्या भाषणात आशा महाडिक म्हणाल्या की, मी दानपेटीत कधीच अकरा रुपये टाकले नाहीत. पण ज्या पतीमध्ये मी परमेश्‍वराचे रूप पाहिले. त्या परमेश्‍वराची सेवा म्हणजेच मी माझ्या पतीची सेवा करत असते. अतिशय भारावून टाकणारे अनुभव आणि खर्‍या अर्थाने आपली दृष्टी उघडायला लावणारे प्रसंग यावेळी उपस्थितांनी ऐकले.
महिलादिनानिमित्त आशा महाडिक यांचा सत्कार करून त्यांच्या प्रेरणादायी कार्यास या जिजामातेने न्याय मिळवून दिला. महिला किती सशक्त व सहनशील असतात. याचे उत्तम उदाहरण येथील शिक्षक, विद्यार्थी, कर्मचारी व मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या पालकांना अनुभवायला मिळाले. शाळेच्या सर्व महिला शिक्षीकांना शाळेच्यावतीने सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. तसेच सर्व शिक्षीकांच्या हस्ते केक कापून महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी मंचावर महाडिक दाम्पत्य, शाळेचे प्राचार्य दिनकरराव टेकणे, उपप्रचार्य दीपक राऊत, जेष्ठ शिक्षिका स्वामी व पालक उपस्थीत होते.