Breaking News

काँग्रेसला मोठा धक्का


नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला आणि काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना मोठा झटका बसला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते टॉम वडक्कन यांनी भाजपत प्रवेश केला आहे. केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी भाजपमध्ये त्यांचे स्वागत केले. 

त्यानंतर त्यांनी भाजप अध्यक्ष अमित शाह यांचीही भेट घेतली. टॉम वडक्कन हे राहुल गांधी यांचे अत्यंत निकटवर्तीय नेते मानले जात होते. इतकेच नाही तर त्यांनी काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांचे स्वीय सचिव म्हणून कामही केले आहे. टॉम वडक्कन यांनी माजी पंतप्रधान आणि दिवंगत काँग्रेस नेते राजीव गांधी यांचे सहाय्यक म्हणूनही काम पाहिले होते.