Breaking News

कर्जतला मोफत आरोग्य शिबिर


कर्जत/ ता. प्रतिनिधी: कर्जत येथील राऊत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मोफत स्री रोग निदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. महिला दिनाचे औचित्य साधून शुक्रवार दि. ८ मार्च रोजी हे शिबिर घेतले जाणार असल्याची माहिती मेडिकल डायरेक्टर डॉ. रवींद्र राऊत यांनी दिली.

या शिबिरामध्ये महिलांच्या सर्व रोगांचे निदान करून उपचार केले जाणार आहेत.सकाळी दहा ते दुपारी तीन या वेळेत हे शिबिर घेतले जाणार आहे. शिबिरात डॉ.ऋषिकेश पंडित, डॉ. मोनिका पंडित, डॉ.अश्विनी राऊत, डॉ.रवींद्र राऊत हे उपचार करणार आहेत. शिबिरात बिनटाका शस्त्रक्रिया ७५ टक्के सवलतीच्या दरात केल्या जाणार आहेत.