Breaking News

आयटी पार्कमधल्या इंजिनिअरची हत्या


पुणेः कानाखाली मारल्याचा जाब विचारला म्हणून पुण्यात संगणक अभियंत्याचा धारदार शस्त्रांनी खून केल्याची घटना समोर आली आहे. मंजित प्रसाद असे मृत तरुणाचे नाव असून तो पुण्यातील आयटी पार्क मध्ये डब्लूएनएस कंपनीत काम करायचा. शुक्रवारी मध्यरात्री पिंपरीच्या डिलक्स चौकात त्यांच्यावर वार करण्यात आले. त्यांचा उपचारादरम्यान काही तासांनी मृत्यू झाला. याप्रकरणी तिघांना पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे.