अडेलतट्टू चीनला बाजूला करून मसूदच्या मुसक्या आवळणार

वॉशिंग्टनः पाकिस्तानमधून चालविली जाणारी दहशतवादी संघटना ‘जैश-ए-मोहम्मद’चा म्होरक्या मसूद अझहर याला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडून आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याच्या मार्गात चीनने बुधवारी पुन्हा एकदा खोडा घातला. त्यामुळे याबाबतचा प्रस्ताव रद्द झाला. आता चीनला डावलून मसूद अजहरवर मोठी कारवाई करण्याचा इशारा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या सदस्यांनी दिला आहे.

जर चीन अडथळा आणून मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित होण्यापासून वाचवत असेल, तर सक्तीने वेगळी कारवाई केली जाईल, असे सुरक्षा परिषदेतील सदस्यांनी म्हटले आहे. पुलवामा येथील हल्ल्यानंतर फ्रान्स, ब्रिटन आणि अमेरिकेने 27 फेब्रुवारीला संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेकडे मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी ठरवण्याबाबतचा प्रस्ताव मांडला होता. चीनने नकाराधिकाराचा (व्हेटो) वापर करीत त्यावर आपली हरकत नोंदवली. त्यामुळे याबाबतचा प्रस्ताव रद्द झाला. यानंतर सुरक्षा परिषदेतील सदस्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर आपले मत व्यक्त केले.

मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी ठरवण्याबाबतचा प्रस्ताव गेल्या दहा वर्षांत चौथ्यांदा मांडण्यात आला. चारही वेळा चीनने त्यात खोडा घातला आहे. त्यावर बोलताना सुरक्षा परिषदेच्या एका सदस्याने म्हटले आहे, की सुरक्षा समितीच्या कामात चीनने खोडा घालू नये. सुरक्षा समितीला आपले कर्तव्य बजावण्यापासून रोखू नये. चीनच्या या भूमिकेवर भारताने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आता भारतीयांवर हल्ला करणार्‍या मसूदवर कारवाई करण्यासाठी सर्व उपलब्ध पर्यायांचा पाठपुरावा केला जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget