Breaking News

कांडगेवस्तीतील शाळेत शिवचरित्र पारायण सोहळ्याची सांगता


शिरूर/प्रतिनिधी: न्हावरे (ता.शिरूर) येथील कांडगेवस्ती परिसरातील जिल्हा परिषदेच्या शाळेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त 11 दिवस सुरु असलेल्या शिवचरित्र पारायण सोहळ्याची सांगता छत्रपती शिवाजी महाराज की जय, हर हर महादेव गर्जना करत मोठ्या ऐतिहासिक वातावरणात पार पडली. 

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त न्हावरे येथील कांडगेवस्ती परिसरातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांसमवेत उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच उपस्थित मान्यवरांनी आजच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात सर्व सामान्य माणसाला तंत्रज्ञानाचा अवलंब करावा लागत असला तरी शिवाजी महाराजांच्या विचारांची देखील तेवढीच महत्त्वाची गरज आहे. 

छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला राज्यकारभार हा स्वार्थासाठी नव्हे तर जन कल्याणासाठी केला होता म्हणून सुसंस्कृत आणि आदर्श पिढी निर्माण होण्यासाठी शालेय जीवनातच खर्‍या विद्यार्थ्यांच्या मनावर शिक्षकांनी थोर संत महात्म्यांच्या विचार रुजविणे गरजेचे असल्याची मते व्यक्त करण्यात आली. याप्रसंगी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संभाजी कांडगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष आबासाहेब कांडगे, शिवविख्याते संजय गायकवाड, केंद्र प्रमुख रामदास विश्वास, शिवविख्यात्या वैष्णवी आरवडे, मुख्याध्यापिका ओव्हाळ, उपशिक्षक संतोष वेताळ, सुरेखा चौधरी, सुनिता करपे, विलास भगत, अनिल भोस, हिरामण करपे, दत्तात्रय करपे, नितीन चौधरी, ग्रामसेवक विठ्ठल करपे आदींसह परिसरातील अनेक मान्यवर मंडळी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.