Breaking News

सुनिल बिडकर यांची पोलिस उपनिरीक्षकपदी निवड


खरवंडी कासार/प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील जांभळी गावातील सुनिल परसराम बिडकर यांची नुकत्याच झालेल्या राज्य सेवा आयोगाच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करीत पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाली. या यशाबद्दल त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे. सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेला सुनिल बिडकर या विद्यार्थाने अतीशय खडतर अशा परिस्थितीत बालवयापासून संघर्ष करत जिद्द आणि चिकाटी जोपासत या यशाला गवसणी घातली आहे.
पाथर्डी तालुका हा अतिशय दुष्काळी परिस्थिती असलेला तालुका आहे. परंतु परीस्थीवर मात करत अलीकडच्या काळात पाथर्डी तालुक्यामधे प्रशासकीय अधिकारी होण्यात तालुक्यातील युवकांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यामुळे पाथर्डीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. विविध स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून तसेच राज्य लोकसेवा आयोग व केंद्रीय लोकसेवा आयोग या परीक्षांच्या माध्यमातून अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगणारे ऊसतोड मजुर कष्टकरी सर्वसामान्य पालकांचे मुल यशाची भरारी घेत आहेत. यापैकीच सुनील बिडकर हा विद्यार्थी आहे. त्याच्या घरची परिस्थिती अतीशय बेताची परंतु संकटावर मात करत त्याने विज्ञान शाखेतून बीएस्सी अ‍ॅग्री पदवी घेत निरंतर अभ्यास करुन पोलिस दलात पोलिस उपनिरीक्षकपदी मजल मारली. या यशाबद्दल सुनीलचे आई-वडील मित्रपरीवार तालुक्यातील लोकप्रतिनिधी यांनी अभिनंदन केले.