Breaking News

श्री क्षेत्र घोगाव येथे ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यात ओसंडला भक्तीभाव


येळगाव / वार्ताहर : कराड तालुक्यातील श्री क्षेत्र घोगाव येथे 22 मार्च रोजी श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा तथा अखंड हरिनाम सप्ताहाला भक्तीभावात प्रारंभ झाला. या सोहळ्यात ग्रंथवाचन, प्रवचन, हरिपाठ, कीर्तन तसेच हरिजागर आदी कार्यक्रमांमध्ये पंचक्रोशीतील भक्तगण तल्लीन होत आहेत. 

संतकृपा मंदीरात सुरु असलेल्या या सोहळ्यात गुरुवारी 28 मार्च रोजी ह.भ.प. बाळकृष्ण महाराज साळशिरंबे यांचे काल्याची कीर्तनसेवा होणार आहे. त्यानंतर महाप्रसाद वाटप होणार असून याचा सर्व भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.