उत्तर खटावचा पाणीप्रश्र्न शिवसेनाच सोडवणार : रणजित भोसले


अर्जून मोहिते यांच्या प्रयत्नाने ललगुणला बंधारा मंजूर
पुसेगाव / प्रतिनिधी : उत्तर खटावचा पाणी ही महत्वाची समस्या असून त्यास जिहे कठापूर हे एकमेव उत्तर आहे. आज वर्धनगडचे सरपंच तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य असणार्‍या अर्जून मोहिते यांनी ललगूण शिंदेवाडी ग्रामस्थांची गरज ओळखून मौलाई ओढ्यावर बंधारा मंजूर करून घेतल्याने या कामाचा सकारात्मक परिणाम येणार्‍या दिवसात दिसून येईल. उत्तर खटावाचा पाणी प्रश्र्न शिवसेनाच सोडवणार असून त्यासाठी आगामी काळात सेनेला साथ द्या असे आवाहन युवासेनेचे जिल्हाध्यक्ष रणजित भोसले यांनी केले
जिल्हा नियोजन समिती सदस्य अर्जून मोहिते यांच्या निधीतून मंजूर झालेल्या बंधारा भूमीपुजन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी ललगुणचे सरपंच जयवंत गोसावी, शिंदेवाडीचे सरपंच तानाजी फाळके, जेष्ठ नेते हणमंतराव शिंदे, संजय नलवडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते
यावेळी रणजित भोसले म्हणाले आगामी निवडणूकी शिवसेनेचा भगवा कोरेगाव विधानसभेवर फडकवण्यासाठी शिवसैनिक तयारीला लागलेत. मागिल पंधरा वर्षाचा विकासाचा बकलॉग भरून काढण्यासाठी परिवर्तन अटळ आहे. आज शिवसेनेचे अर्जून मोहीते लाखोची कामे करून वर्धनगड रोल मॉडेल करू शकतात तर मागिल पंधरा वर्षात विद्यमान आमदारांनी काय केले हे तपासून पाहण्याची गरज आहे असे रणजित भोसले म्हणाले
यावेळी वर्धनगडचे सरपंच तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य अर्जून मोहीते म्हणाले पालकमंत्री विजय बापू शिवतारे आणि कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष नितीन बानगुडे सरांच्या सहकार्यातून आज ललगूण शिंदेवाडीसाठी फायद्याचा ठरणारा बंधारा शिवसेनेच्या माध्यमातून होत याला मनस्वी आनंद होत आहे. भविष्यकाळात शिवसेनेला साथ देऊन विधानसभेला परिवर्तन करा असे अवाहन सरपंच अर्जून मोहीते यांनी केले
यावेळी संजय फाळके,शरद फाळके, ललगुणचे माजी सरपंच धनाजी घाडगे, विनोद घाडगे,हणमंत बनकर, प्रविण घाडगे,विजय घाडगे, वर्धनगडचे उपसरपंच अविनाश पाचांगणे, यांच्यासह कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget