Breaking News

खोपोलीजवळील अपघातात तीन ठार, तीन जखमी


पनवेल - मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खोपोलीजवळ भीषण अपघात झाला. ट्रक आणि आर्टिका कारच्या धडकेत तीन जणांचा मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. पुण्याच्या दिशेने भरधाव वेगात जाणार्‍या आर्टिका कारची पुढे चाललेल्या ट्रकला मागून धडक बसली. या अपघातात कारमधील तीन जण जागीच ठार झाले असून दुसर्‍या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.

जखमी झालेल्यापैकी दोन जणांना एमजीएम तर एकाला लोकमान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातात ठार झालेल्या तीन जणांचे मृतदेह खालापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत.