Breaking News

'त्या' मुलीची निर्घृण हत्या तिच्याच जन्मदात्या बापाने केली!जामखेड तालुक्यातील चौंडी गावातील १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती या मुलीची निर्घृण हत्या तिच्याच जन्मदात्या बापाने केली असून या खुनामध्ये मुलीच्या दोन मामांचाही हात असल्याचे पोलिस तपासातून निष्पन्न झाले असून याप्रकरणी फिर्यादी मयत मुलीचा बाप पाडुरंग सायगुडे मामा राजेंद्र जगन्नाथ शिंदे, ज्ञानदेव जगन्नाथ शिंदे ( दोघे रा - निमगाव डाकू, ता कर्जत) या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. मुलीच्या बापाने दि २४ रोजी मुलीचे अपहरण झाल्याचा बनाव केला होता.स्थानिक गुन्हे शाखा व जामखेड पोलिसांच्या सतर्कतेमुळे माहिती मिळताच अवघ्या दोन दिवसात हा प्रकार उघडकीस आला आहे. 

आरती पांडुरंग सायगुडे (वय-१७) असे हत्या झालेल्या मुलीचे नाव आहे.दि २८ रोजी जामखेड तालुक्यातील चौंडी येथे एका अल्पवयीन मुलीचा मृतदेह जळालेला व कुजलेल्या अवस्थेत आढळून आला.होता यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली होती आरती ही कर्जत तालुक्यातील चापडगाव येथील महाविद्यालयात शिकत होती.आठ दिवसांपासून बेपत्ता होती. त्यानंतर गुरूवारी सकाळी तिचा मृतदेह चोंडी येथील सायगुडे वस्तीजवळ गोवर्धन हरीभाऊ शिंदे यांच्या शेताजवळ सडलेल्या व काही भाग कुत्र्याने खाल्लेल्या अवस्थेत  तलाव परिसरात आढळून आला आहे.

त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने तपासाचे चक्रे वेगाने फिरवत ३० संशयितांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली मयत मुलीच्या कुटुंबीयांकडेही पोलिसांनी चौकशी केली दरम्यान तपास करताना तफावत चौकशीअंती आरतीचा मारेकरी हा तिचा जन्मदाता वडील पांडुरंग श्रीरंग सायगुंडे व दोन मामा राजेंद्र जगन्नाथ शिंदे, ज्ञानदेव जगन्नाथ शिंदे असल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी या तिघांना पोलिसांनी अटक केली आहेत.पोलीस अधीक्षक इशु सिंधू यांंच्या मार्गदर्शाखाली स्थानिक शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार , जामखेड पोलीस स्टेेेशन पोलिस निरीक्षक पांडुरंग पवार, सहाय्यक पोलिस निरीक्षक निलेश कांबळे , सहायक पोलिस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांनी तपास केला