Breaking News

आदर्श आचारसहिता भंग होणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्या


 सिंदखेड राजा,(प्रतिनिधी): सार्वत्रिक लोकसभा निवडणूक 2019 आचार संहिता लागू झाली आहे त्यामुळे आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी असे आवाहन सहाय्यक निवडणूक डॉ विवेक काळे यांनी केले यावेळी यावेळी निवडणुकीसंदर्भात आणि आचार संहिता संबंधित विविध प्रश्‍नाचे शंका चे निरीक्षण डॉक्टर काळे यांनी केले.

 सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत कार्यक्रम झाला जाहीर झाला असून त्याची माहिती देण्यासाठी तहसील कार्यालय येथे पत्रकार परिषद आयोजित केले होते यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर काळे यांनी सिंदखेड राजा उपविभागात 332 बुथवर मतदान होणार असून तीन लाख 7000 मतदार यावेळी आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे या मतदान प्रक्रियेसाठी सतराशे 90 कर्मचारी राहणार असून 44 बस आणि 60 छोटी वाहने असणार आहेत अपंगासाठी राहणार आहेत आचारसहिताच भंग होत असेल तर  त्यासाठी निवडणूक विभागान ऍप तयार केला असून90 मिनिटात केलेल्या तक्रारीचा  आचारसंहितेचा भंग होणार नाही यासाठी 8 फ्लाईंग स्कोर तयार केले आहेत उमेदवाराला विविध परवानग्या लागतात त्यासाठी एक खिडकी योजनेतून सर्व परवानग्या एकाच ठिकाणी देण्यात येणार आहेत असे सांगून  बुलढाण्यात दुसर्‍या टप्प्यात मतदान होणार आहे.

निवडणुकीची अधिसूचना 19 मार्चला होणार असून नाम निर्देशन पत्र 26 मार्चपर्यंत अर्जाची छाननी 27 मार्चला  उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा 29 तारखेला  मतदान दिनांक 18 एप्रिल ला आणि मतमोजणी मतमोजणी 23 में या तारखेला होणार आहे असे सांगितले या पत्रपरिषदेला तहसीलदार संतोष कणसे देऊळगाव राजा तहसीलदार निकिता जावरकर प्रशांत वाघ आदी उपस्थित होते.