Breaking News

गावगुंडांचीं पोलिसास मारहाण


राहाता/प्रतिनिधी: सोरट पान नावाचा जुगार खेळण्याच्या वादावरुन मारहाण केलेल्या आरोपीला पकडण्याकरीता गेलेल्या पोलिसावर गावगुंडांनी हल्ला करीत गंभीर जखमी केल्याची घटना राहात्यामध्ये घडली. याझालेल्या मराहणीमध्ये पोलीस कर्मचारी सुनिल मालनकर (वय 26 वर्षे) गंभीर जखमी झाले. शिर्डी येथील साईबाबा सुपर स्पेशालिटी रूग्णालयात त्यांच्यावर उपचार चालू आहेत. राहाता येथीलआठवडे बाजारात ही घटना घडली. पोलिसांनी या प्रकरणी एकास अटक केली आहे.

याबाबत माहिती अशी :

आठवडे बाजारात सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास या ठिकाणावरुन भाजीपाला खरेदी करण्यासाठी मंजित रामनरेश केवट (२५, रा. उत्तर प्रदेश) हा त्याच्या मित्रांसोबत व कुटुंबासमवेतआला होता. यावेळी विकी चावरे , प्रकाश आरणे व भावडया शाक यांनी त्यांना सोरट पान नावाचा जुगार खेळण्यास बळजबरी केली.परंतु यास नकार दिल्याने राग येऊन या तिघांनी मंजीत वत्याचा साथीदारांना मारहाण केली. या प्रकरणी मंजितने पोलिसांत फिर्याद दिली असता या प्रकरणाच्या चौकशीसाठी पोलिस नायक सुनिल मालनकर गेले असता विकी चावरे, भावड्या शाक, प्रकाश आरणे यांनी या जिवघेणा हल्ला करीत त्यांना गंभीर जखमी केले. हि माहिती समजताच इतर पोलिस कर्मचाऱ्यांनी तिथे धाव घेतली. या झटापटीदरम्यान विकी चावरे याला पोलिसांनीताब्यात घेतले. बाकी दोघे फरार असून त्यांच्यावर जिवे मारण्याचा प्रयत्न व सरकारी कामात अडथळा असे गुन्हे दाखल केले आहेत. इतर आरोपींचा शोध सुरू आहे.