Breaking News

भातोडीतील उर्दू शाळेत शिक्षकांचा गौरव


अहमदनगर/प्रतिनिधी : येथील भातोडी जिल्हा परिषद उर्दू शाळेतील महिला शिक्षिकांचा महिला दिनानिमित्त नगर तालुका राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेलचे पापामियाँ पटेल यांच्या वतीने गौरव करण्यात आला. कार्यक्रमास भातोडीचे सरपंच संगीता नेटके, उपसरपंच भरत लबडे, निसार शेख, रियाज शेख, ज्ञानदेव लबडे, अशोक तरटे, नरवडे, ठोंबरे, आजीनाथ शिंदे आदि उपस्थित होते. कार्यक्रमास नरसिंह माध्यमिक संस्थेचे सर्व शिक्षक व पदाधिकारी तसेच जिल्हा परिषद शाळेचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.