Breaking News

डॉ. सहस्त्रबुद्धे यांना संत सेवा पुरस्कार प्रदान------


श्रीगोंदे/प्रतिनिधी : श्रीगोंदे शहराचे ग्रामदैवत सद्गुरू श्री संत शेख महंमद महाराज याञे निमित्ताने आयोजित करण्यात आलेला पारायण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी प्राचार्य अनिल सहस्त्रबुद्धे यांना संत सेवा पुरस्काराने सन्मालित केले.

श्रीगोंदे शहराचे ग्रामदैवत भारतातील हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या संत शेख महंमद महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्रीगोंदे शहरात मोठी यात्रा भरत असते. दरवर्षी यात्रेच्या अगोदर अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. या सप्ताहात महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार आपल्या कीर्तनातून समाज प्रबोधनाचे काम करतात. यावर्षी सप्ताहाची सांगता हभप रामराव महाराज ढोक यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली.

काल्याचे किर्तन सुरू होण्यापूर्वी रयत शिक्षण संस्थेतील सेवानिवृत्त प्राचार्य श्रीरंग लोखंडे यांनी प्रतिष्ठानच्या मदतीने संत शेख महंमद महाराज यांचे समग्र साहित्य सार्थ स्वरूपात प्रकाशित करण्यासाठी अथक प्रयत्न केले होते. लोखंडे यांनी केलेल्या कामाची दखल घेऊन प्रतिष्ठानच्यावतीने त्यांच्या स्मरणार्थ संत सेवा पुरस्कार नगर येथील साहित्यिक माजी प्राचार्य डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे यांना देण्यात आला. सहस्त्रबुद्धे यांनी संत शेख महंमद महाराज यांचा योगसंग्राम ग्रंथ सार्थ स्वरूपात संपादित केला. 
 
या कार्यक्रमास आ. राहुल जगताप, माजी मंत्री बबनराव पाचपुते, सभापती महिला बालकल्याण समिती जि.प.अनुराधा नागवडे, नगराध्यक्ष शुभांगी पोटे उपस्थित होते.