Breaking News

पश्‍चिम बंगालमध्ये शिवसेना निवडणूक लढविणार

महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेना ’एकदिलाने’ लोकसभेच्या रणांगणात उतरले आहेत. मात्र, इतर काही राज्यांमध्ये भाजपविरुद्ध शिवसेना उमेदवार उभे करणार आहे. पश्‍चिम बंगालमध्ये शिवसेना पहिल्यांदाच निवडणूक लढविणार आहे. शिवसेना 15 जागांवर उमेदवार उभे करणार असून त्यातल्या 11 नावांची घोषणा करण्यात आली आहे, तर चार उमेदवारांची घोषणा लवकरच केली जाण्याची शक्यता आहे.