Breaking News

सचिन मस्के यांची पोलिस उपनिरीक्षकपदी निवडघोटण/प्रतिनिधी
घोटण गावचे सुपुत्र व शेतकरी कुटुंबातील असणारे सचिन शिवाजी मस्के यांची पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाली. ही बातमी समजताच गावात आनंदाचे वातावरण तयार झाले. विविध ठिकाणी त्यांचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.
सचिन मस्के हे ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील होतकरू व अभ्यासू व्यक्तिमत्व ठरले. गरीबी परिस्थितीची लाज न बाळगता त्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. गेल्या अनेक दिवसापासून त्यांनी सातत्याने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून, त्यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी एक नवा आदर्श समोर ठेवला आहे. हे त्यांच्या कष्टाला मिळालेले प्रामाणिक पणाचे फळ आहे. त्यांनी माध्यमिक शिक्षण हे घोटण येथे व महाविद्यालयीन शिक्षण शेवगाव येथे घेतले. त्यांच्या या निवडीमुळे त्यांचे तालुक्यातून सर्वत्र कौतुक होत आहे.