Breaking News

विविध उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांनी केली मतादानाविषयी जनजागृती


नेवासे/प्रतिनिधी: नेवासे शहरात शालेय विद्यार्थ्यांनी विविध उपक्रमांद्वारे मतदानाविषयी जनजागृती केली. यावेळी विद्यार्थ्यांनी जनजागृती रॅली, पथनाट्य सादरीकरण आदींचे आयोजन केले होते. पथनाटयाद्वारे मतदानाविषयी केलेली जनजागृती सर्वांचे आकर्षण ठरली. राष्ट्रीय कर्तव्य समजून मतदानाचा हक्क सर्वांनी बजवावा असे आवाहन शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी शंकररावगाले यांनी रॅलीच्या शुभारंभ प्रसंगी बोलताना केले.

नेवासा पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या वतीने गटशिक्षणाधिकारी विलास साठे यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आलेल्या मतदार जनजागृती रॅलीचा शुभारंभ येथील ज्ञानोदयइंग्लिश स्कूलच्या प्रांगणातून करण्यात आला.यावेळी विस्तार अधिकारी शंकरराव गाले यांनी हिरवा झेंडा दाखवून रॅलीचा शुभारंभ केला. या रॅलीत केंद्रप्रमुख शाम फंड,ज्ञानोदय इंग्लिश स्कूलचेमुख्याध्यापक जगन्नाथ आढाव,सुंदरबाई कन्या विद्यालयाच्या प्राचार्या रंजना देशमुख,बापूसाहेब चव्हाण, काकासाहेब काळे, बाळासाहेब शिंदे,सुधीर बोरकर, अवधूत पुंड,अशोक कहार आदींनीसहभाग घेतला.

या रॅलीत ज्ञानोदय इंग्लिश स्कूल,सुदंरबाई कन्या विद्यालय,बदामबाई गांधी विद्यालय,आदर्श विद्या मंदिर, अलअमीन उर्दू हायस्कूल या विद्यालयांतील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागीझाले होते.

यावेळी घोडेगाव येथील घोडेश्वरी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मतदान जनजागृती विषयी पथनाट्य सादर केले.या पथनाट्चे आयोजन शिक्षक अविनाश निकाळजे यांच्या नेतृत्वाखाली करण्यातआले. पथनाट्याद्वारे नागरिकांमध्ये मतदानाविषयी जनजागृती करण्यात आली. नगरपंचायत चौकात मतदार जनजागृती रॅलीचा समारोप करण्यात आला.