Breaking News

सूरज तुपे ठरला सीड आयटी आयडॉल


अहमदनगर/प्रतिनिधी : पुण्याच्या सीड इन्फोटेक संस्थेतर्फे घेण्यात आलेल्या सीड आयटी आयडॉल अहमदनगर स्पर्धा घेण्यात आली. त्यात विखे फाऊंडेशनच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील सूरज तुपे विजेता ठरला.

छत्रपती महाविद्यालयाची विद्यार्थिनी निशिगंधा भूकन हिने द्वितीय, तर नगर महाविद्यालयाची प्रीती राजगुरू हिने तृतीय क्रमांक मिळवला. स्पर्धकांना सीड’च्या भारती बारहाते, प्रवीण लाखे, सुशील सावंत, शीतल आहेर, रेणुका राठोड, तेजा पाठक यांच्या हस्ते पदके देण्यात आली. विविध महाविद्यालयांतील सुमारे 3500 विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात आली.त्यातून तुपे विजयी ठरला. सीडच्या संपदा भुसारी यांनी स्पर्धेचे संचलन केले. प्राची पवार यांनी स्वागत केले.