मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न पाहिल्यामुळे ही अवस्था : खडसे


जळगाव : चाळीस वर्षांच्या काळात अनेक मंत्रिपदे मिळाली, मात्र मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहिले म्हणून कोणताही गुन्हा नसताना आपली ही अवस्था झाली, अशा शब्दात भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी पुन्हा आपली खदखद व्यक्त केली आहे.

आपण मंत्रिपदावर असताना जाती-धर्माच्या आधारावर नव्हे तर मुस्लिम समाज मागास असल्याने सामाजिक भावनेतून आपण नेहमीच मुस्लिम समाजाच्या पाठीशी उभे राहण्याचा प्रयत्न केला, असे खडसे सांगत होते. जळगाव जिल्ह्यातील सावदामध्ये मुस्लिम समाजाच्या वतीने आयोजित ‘एक शाम नाथाभाऊ के नाम’ या मुशायराच्या कार्यक्रमात एकनाथ खडसे बोलत होते. मंत्रिपदावर असताना मुस्लिम वख्त बोर्डाच्या महागड्या जमिनी ताब्यात घेत असताना त्यातील एका जमिनीवरील इमारत पाडण्याची नोटीस दिली होती, ती जमीन अंबानींची निघाली. यावेळी केलेली कारवाई आमच्याकडे काही जणांना आवडली नाही. त्यावेळी मोठा दबावही आला होता. मात्र सामाजिक भावनेतून आपण चांगले काम करण्याचा प्रयत्न केला होता, असेही खडसे म्हणाले. मंत्रिपदाचे काय, येतात आणि जात असतात. 40 वर्षांच्या काळात आपण अनेक मंत्रिपद भूषवली असे खडसे सांगत असतानाच ‘पुढील काळात आपल्याला मुख्यमंत्रीपद मिळावे’ अशी इच्छा एका मुस्लिम कार्यकर्त्याने व्यक्त केली.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget