Breaking News

काटकरवाडीत आज भव्य महायज्ञोत्सव


पुसेगाव,  (प्रतिनिधी) : महाशिवरात्रीचे औचित्ताने काटकरवाडी येथे सोमवारी महायज्ञाचे नियोजन करण्यात आले आहे. वेद अभ्यासक ऍड. शंकर निकम यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या यज्ञात स्पंदन शास्त्राने तयार केलेल्या शिवगायत्री मंत्राचे तथा शिवसुक्त स्तोत्राचे पठण केले जाणार आहे. त्याचबरोबर समाजातील जातीभेद नष्ट करण्यासाठी ऍड. निकम यांच्या मातोश्रींच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या शकूंतला सभागृहाचाही लोकार्पण सोहाळा होणार आहे. आध्यात्मिक, धार्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांसाठी या सभागृहाची उभारणी करण्यात आल्याचे संयोजकांनी कळविले आहे.