Breaking News

नेवासे येथे गाथा पारायण सोहळा सुरू


नेवासे/प्रतिनिधी: येथील संत तुकाराम महाराज मंदिरामध्ये तुकाराम बीजेच्यानिमित्ताने गाथा पारायण सोहळ्यास शुक्रवार दि.15 मार्च पासून प्रारंभ होत आहे. गाथा पारायण सोहळ्याची व होणार्‍या कीर्तन महोत्सवाची जय्यत तयारी नेवासे येथे सुरु झाली आहे. 

22 मार्च पर्यंत हा सोहळा चालणार आहे. अशी माहिती सोहळ्याचे संयोजक हभप उद्धव महाराज मंडलिक यांनी दिली. श्री संत गंगागिरी महाराज व ब्रम्हलीन गुरुवर्य नारायण गिरी महाराज, गुरुवर्य ब्रम्हलीन बन्सी महाराज तांबे, गुरुवर्य एकनाथ स्वामी महाराज, परमश्रध्येय भास्करगिरी महाराज यांच्या कृपाशिर्वादाने व संयोजक हभप उद्धव महाराज मंडलिक नेवासेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आठ दिवस चालणार्‍या या सोहळ्यामध्ये पहाटे काकडा भजन, विष्णूसहत्रनाम सकाळी 7 ते 11.30 गाथा पारायण सोहळा, दुपारी 3 ते 5 संगीत भजन, सायंकाळी 5 ते 6 हरिपाठ, सायंकाळी 7 ते 9 या वेळेत किर्तनाचे कार्यक्रम होणार आहे.