Breaking News

फलटण ग्रामीण पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी आनंद पवार


फलटण / प्रतिनिधी : फलटण तालुका ग्रामीण पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी आसू येथील आनंद पवार, उपाध्यक्षपदी आरडगाव येथील सुरेश भोईटे, तर सचिवपदी सांगवी येथील दीपक मदने, प्रसिद्धी प्रमुखपदी निरगुडीचे रोहन झांजुर्णे तर खजिनदारपदी कोळकीतील श्रीकृष्ण सातव यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांचे विविध स्तरावरून अभिनंदन होत आहे.

संघाचे मावळते अध्यक्ष नीलेश सोनवलकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संघाच्या बैठकीत या निवडी करण्यात आल्या. या बैठकीस ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष विनायक शिंदे, स. रा. मोहिते, सूर्यकांत निंबाळकर, शशिकांत सोनवलकर, राजाभाऊ भागवत, नानासाहेब मुळीक, अशोक सस्ते, तानाजी भंडलकर, वैभव गावडे, सुभाष सोनवलकर, सचिन निंबाळकर, रोहित सोनवलकर मुगुटराव कदम आदी उपस्थित होते.