मल्हारपेठमध्ये राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेस उत्सफूर्त प्रतिसाद


पाटण, (प्रतिनिधी) : मल्हारपेठ येथे भरवण्यात आलेल्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये 50 किलो वजनी गटात हातकणंगलेतील मोती स्पोर्ट्स संघाने, तर 65 किलो वजनी गटामध्ये शिव शक्ती स्पोर्टस संघ सदाशिवगड यांनी बाजी मारून प्रथम क्रमांकाचेेे बक्षीस मिळविले.

मल्हारपेठ येथील समर्थ क्रीडा मंडळ व ग्रामस्थ मंडळाच्या संयुक्त विद्यमाने नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय भव्य कबड्डी स्पर्धेस संपूर्ण राज्यभरातून उत्सफूर्त प्रतिसाद मिळाला. समर्थ क्रीडा नगरी मैदानावर 50 किलो वजनी गटातील सघांचे सामने पार पडले. त्यामधे 20 संघानी आपला सहभाग नोंदवला होता. यंदाच्या वर्षी दुसर्‍यावेळी होत असलेल्या राज्यस्तरीय स्पर्धा पाहण्यासाठी क्रीडाप्रेमींनी मोठी गर्दी केली होती. पहिल्या दिवशी झालेल्या कबड्डी स्पर्धेमध्ये सायंकाळपासून प्रारंभ झाला. त्यामध्ये 65 किलो गटात प्रथम क्रमाकाच्या बक्षीस शिवशक्ती स्पोर्ट्स संघ सदाशिवगड, वैशाली स्पोर्ट्स क्लब, पोफळी यांच्यात झालेल्या अटीतटीच्या सामन्यात सदाशिवगड संघाने एक पॉईन्ट घेत पोफळी संघाचा पराभव करत प्रथम क्रमाकांचे दहा हजार एक रूपये व सन्मानचिन्ह असे पारितोषिक देण्यात आले. द्वित्तीय क्रमांकाचे सात हजार एक रूपयांचे बक्षिस वैशाली स्पोर्ट्स क्लब पोफळी यांना देण्यात आले. तृतीय क्रमांकाचे पाच हजार एक रूपयांचे पारितोषिक मातृछाया क्लब विहे यांनी मिळवले. तर चतुर्थ क्रमांकाचे दोन हजार एक रूपयांचे बक्षिस लिबर्टी मजदूर संघ कराड यांना मिळाले. आदर्श संघ म्हणून हिंदकेसरी क्लब कवठेपिराण, जि. सांगली यांना तर उत्कृष्ट पक्कडीसाठी शुभम पवार, उत्कृष्ट चढाईपटू म्हणून संकेत उमाशे यांना पुरस्कार देवून गौरविण्यात आले.

50 किलो वजनी गटात 25 संघानी आपली नावनोंदणी केली होती प्रथम क्रमांकाच्या सात हजार एक रूपयांच्या बक्षीसासाठी झालेल्या मोती स्पोर्ट्स क्लब हातकलंगले व लिबर्टी मजदूर संघ कराड यांच्यात झालेल्या रंगतदार कबड्डी सामन्यात हातकलगले संघाने चार पॉईन्टने कराड संघावर मात करत प्रथम क्रमांकाचे बक्षिस पटकले, तर लिबर्टी मजदूर संघाला द्वित्तीय क्रमांकाचे सहा हजार एक रूपयांचे पारितोषिक देण्यात आले. तृतीय क्रमांकाचे चार हजार एक रूपयांचे बक्षिस शिवशक्ती क्रीडा मंडळ सदाशिवगड यांनी पटकवले तर चतुर्थ क्रमांकाचे दीड हजार एक रूपयांचे बक्षिस हिंदकेसरी क्रीडा मंडळ कवठेपिरण या संघाला मिळाले. डॉ. उदय वनारसे, प्रकाश पाटील, आबासो वाघ, विकास डिगे, उपसरपंच निलेश चव्हाण, किशोर जैन, संजय जैन, समर्थ क्रीडा मंडळाचे अध्यक्ष व्यंकटराव चव्हाण, श्रीकांत पालसांडे, संपतराव देसाई, अशोक कदम, व पंच देशमुख यांच्या हस्ते विविध मान्यवरांना व यशवंत संघांना गौरविण्यात आले. या कबड्डी स्पर्धेसाठी जिल्हा आसोशिएशनच्या आठ पंचांनी काम पाहिले.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget