Breaking News

मलकापूर ग्रामीण ग्रा.पं.च्या सरपंच पदाच्या निवडणुकीत राजपूत विजयी


मलकापूर,(प्रतिनिधी):  येथील मलकापूर ग्रामीण ग्रामपंचायत निवडणुकीत प्रथमच सरपंच थेट जनतेतून पार पडलेल्या या निवडणुकीत कुणालसिंह ईश्‍वरसिंह राजपूत हे 141 मतांनी विजयी झाले आहेत. या निवडणुकीत 6775 मतदारांपैकी 4609 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. या मध्ये थेट सरपंच पदासाठी एकूण 7 उमेदवार निवडणूक रिंगणात उभे ठाकले होते.

त्यामध्ये कुणालसिंह राजपूत हे सर्वाधिक 4161 मते मिळवून विजयी झाले. तर उमेदवार उमेश राऊत 1320, ललित बाठे 849, अ‍ॅड. राजेंद्र चोपडे 648, ज्योत्स्ना तळोले 212, रेखा बोंबटकार 43, प्रकाश थाटे यांना केवळ 38 मते मिळाली, तर 17 ग्रा.पं.मध्ये प्रभाग क्रमांक 1 मधून संजय जामोदे व प्रभाग क्रमांक 3 मधून लताबाई रमाकांत सुपे हे दोन उमेदवार अविरोध निवडून आले होते. तर 15 ग्रा.पं. सदस्यांकरिता झालेल्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 1 मधून लाडकाबाई रामभाऊ महाले 532 मते, प्रभाग क्रमांक 2 मधून सुवर्णा अजय चोपडे 502 मते, नितीन गावंडे 464 मते, ज्योत्स्ना तळोले 442 मते, प्रभाग क्रमांक 3 मधून भूषण नाफडे 446 मते, दीपाली नितीन भोळे 449 मते, प्रभाग क्रमांक 4 मधून सोपान नामदेव हिवाळे 499 मते, सुशीला शारंगधर बाठे 588, प्रेमकुमार इंगळे 407, तसेच प्रभाग क्रमांक 5 मधून सरस्वती पुंजाजी चव्हाण 414, राहुल गणेश करांडे 358, स्वाती सुदेश नाईक 376,तर प्रभाग क्रमांक 6 मधून सत्यभामा उंबरकर 472, देविदास बोंबटकार 475, सुनीता गवात्रे 337 मते घेऊन विजयी झाले आहेत. सरपंचासाठी उमेश राऊत यांचा 141 मतांनी पराभव झाला आहे.