Breaking News

आजी- माजी खासदारांची कराडमध्ये भेट


कराड / प्रतिनिधी : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे लोकसभेचे उमेदवार व विद्यमान खासदार उदयनराजे भोसले यांनी आज (दि. 13) सायंकाळी सहा वाजता माजी राज्यपाल व माजी खासदार श्रीनिवास पाटील यांची कराड येथील निवासस्थानी भेट घेतली. यावेळी कराड- पाटण तालुक्यातील राजकीय समीकरणे कशी आखयची आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची सभा घेण्याविषयी चर्चा करण्यात आली. 

खासदार उदयनराजे भोसले यांच्यासोबत विजयसिंह यादव, सुनील काटकर, शिवसेनेचे नरेंद्र पाटील आदी उपस्थित होते. सुमारे दीड तास याठिकाणी कराड- पाटण तालुक्यात कोणते आखाडे आखायचे याविषयी चर्चा झाली. काही दिवसांपूर्वी सातारा लोकसभा मतदारसंघातून उदयनराजे की श्रीनिवास पाटील यांना उमेदवारी मिळणार अशी साशंकता होती. या पार्श्र्वभूमीवर या भेटीस विशेष महत्त्व आहे.