Breaking News

सौ. मधुराणी थोरात यांना यशवंत गौरव पुरस्कार जाहीर


कराड, (प्रतिनिधी) : येथील यशवंत नगरी न्यूज नेटवर्कच्यावतीने सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणार्‍या महिलांसाठी दिला जाणारा यशवंत गौरव पुरस्कार ज्ञानदीप राष्ट्रीय सामाजिक व शैक्षणिक विकास संस्थेच्या संचालिका सौ. मधुराणी आनंदा थोरात यांना जाहीर झाला आहे.

या पुरस्काराचे वितरण जागतिक महिला दिनाच्या पुर्वसंध्येला गुरुवार, दि. सात मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता कराड अर्बन बँकेच्या मुख्य कार्यालयातील शताब्दी सभागृहात होणार आहे. यावेळी ज्येष्ठ संपादक डॉ. उदय निरगुडकर, सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष ना. शेखर चरेगावकर, जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्विनी सातपुते, अर्बन कुटूंब प्रमुख सुभाषराव जोशी, प्राना फौंडेशनच्या अध्यक्षा डॉ.प्राची पाटील आदींसह मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.

सौ.मधुराणी आनंदा थोरात या ज्ञानदीप राष्ट्रीय सामाजिक व शैक्षणिक विकास संस्थेच्या माध्यमातून 2009 पासून आरोग्य, ग्रामीण विकास, शिक्षण, पर्यावरण व महिला बालकल्याण आणि कौशल्य विकास क्षेत्रात नाविण्यपुर्ण उपक्रम राबवित आहेत.

अनेक सामाजिक उपक्रमांत त्यांचा सक्रिय सहभाग असतो. त्यांच्या या सामाजिक क्षेत्रातील योगदानाची दखल घेवून हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहेत.