Breaking News

लिंपणगावच्या सरपंचांविरोधात अविश्वास ठराव


श्रीगोंदे / प्रतिनिधी

तालुक्यातील राजकीय दुरष्ट्या

महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या लिंपणगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच माधुरी साळवे यांच्या विरोधात ग्रामपंचायत सदस्यांनी अविश्वासाचा ठराव दाखल केला आहे. तास ठराव तहसिलदारमहेंद्र माळी यांच्याकडे दाखल केला आहे. या आधी दोन सरपंचावर अविश्वास ठराव होऊन त्यांना पायउतार व्हावे लागले आहे.

अविश्वास ठराव दाखल करून घेतल्यानंतर तहसीलदारांनी 14 मार्च रोजी या अविश्वास दर्शक ठरावावर मतदान करण्याचे आदेश सदस्यांना दिले आहेत. सन 2015 रोजी ग्रामपंचायतनिवडणूक झाली. सरपंच पद हे अनुसूचित जातीसाठी आरक्षित असल्याने त्यावेळी प्रथम सरपंच मंजुळ गोळे ह्या सरपंच पदावर विराजमान झाल्या. परंतु त्यांच्यावरही एक वर्षानंतर सदस्यांनीअ विश्वासदर्शक ठराव दाखल करून तो मंजूर झाला ,त्यानंतर रेणुका दर्शन सरपंच पदावर विराजमान झाल्या त्यांनाही विकास कामाच्या मुद्द्यावरून सरपंच पदावरून अविश्वासदर्शक ठरावानेहटविण्यात आले होते. त्यानंतर जुलै 2018 रोजी तिसऱ्या सरपंच म्हणून माधुरी साळवे ह्या सरपंच पदावर विराजमान झाल्या आता त्यांनाही अविश्वास ठरावाला सामोरे जाण्याची नामुष्कीओढवली आहे.

या सततच्या अविश्वास ठरावामुळे 14 व्या वित्त आयोगातून होणाऱ्या विकास कामावर मोठा दुष्परिणाम होत आहे अशी प्रतिक्रिया नागरिकांमधून येत आहे.