Breaking News

सांगवी दुमाला येथील वाळू तस्करांवर श्रीगोंदा पोलिसांची कारवाई


श्रीगोंदे/प्रतिनिधी: तालुक्यातील सांगवी दुमाला येथील भीमा नदी पात्रात अवैध वाळू तस्करी असल्याची माहिती श्रीगोंदे पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव यांना मिळताच त्यांनी श्रीगोंदे पोलिसांचे पथक घेऊन थेट सांगवी दुमाला भीमा नदी पात्रात उतरले. तस्करी करणार्‍या दोन तस्करांना पोलिसांनी पकडले असून त्यांच्याकडून 14 लाख 15 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. असल्याची माहिती ठाणे अमलदार पोलिस हेडकॉन्स्टेबल रघुवीर खेडकर यांनी दिली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील सांगवी दुमाला येथे भीमा नदी पात्रात अवैधरित्या वाळू तस्करी मोठ्या प्रमाणात चालू असते दोन वेळा अपर पोलिस अधीक्षक यांनी मोठी कारवाई याच नदीपात्रात याच ठिकाणी केली होती. अनेक वेळा श्रीगोंदे पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कारवाया केल्या असल्या तरी अवैध वाळू तस्करी बंद झालेली नसून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवैध वाळू तस्करी सुरू असल्याची माहिती श्रीगोंदे पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव यांना मिळाली होती. त्यांनी पोलिसांचे पथक घेऊन भीमा नदी पात्रात उतरून अवैध वाळू तस्करी करणार्‍या 2 वाळू ट्रक एम.एच. 42 बी. 0 786, व 3ब्रास वाळू असा 5 लाख 9 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल तर एम. एच. 12 इ एफ 3577 व दोन ब्रास वाळू असा 5 लाख 6 हजार किमतीचा मुद्देमाल व एक सँक्शन बोट एक फायबर बोट ऑईल इंजिन 4 लाख किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. एकूण 14 लाख 15 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

पोलिस कॉन्स्टेबल अमोल आजबे यांच्या फिर्यादीवरून आप्पा पांडुरंग राठोड राहणार सोनवडी तालुका दौंड जिल्हा पुणे ज्ञानदेव यशवंत मदने राहणार सांगवी दुमाला तालुका श्रीगोंदे व सेक्शन बोटीचा अज्ञात मालक या तिघांविरोधात श्रीगोंदे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती ठाणे अंमलदार रघुवीर खेडकर यांनी दिली आहे.