Breaking News

करंजेतील श्रीपतराव हायस्कूल उपक्रमशील : नाईक


सातारा, (प्रतिनिधी) : शिक्षण प्रसारक संस्था करंजेपेठ सातारा संचालित श्रीपतराव पाटील हायस्कूल व ज्यनियर कॉलेज कंरजेपेठ सातारच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी सातारा जिल्ह्याचे अधिकारी युवराज नाईक होते. प्रमुख पाहुणे जायन्ट्‌स गु्रप ऑफ सातारचे अध्यक्ष व उद्योजक मनोज देशमुख होते तर संस्थेचे अध्यक्ष ऍड. प्रतापराव पवार, श्री. नंदकुमार जगताप, संचालिका सौ. हेमकांची यादव, सौ. प्रतिभा चव्हाण, शालाप्रमुख सौ. सुनंदा शिवदास आणि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर जिद्द आणि सचोटी कायम राखली पाहिजे, असे मनोज देशमुख यांनी या वेळी सांगितले. संस्थेचे अध्यक्ष ऍड. श्रीपतराव पवार यांनी संस्थेच्या व शाळेच्या प्रगतीचा अहवाल मांडताना शाळेच्या व संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त निमंत्रितांच्या कबड्‌डी स्पर्धा होणार असल्याचे सांगितले.

अध्यक्षीय भाषणात जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक यांनी करंजेतील श्रीपतराव हायस्कूल संपूर्ण जिल्ह्यात उपक्रमशील असल्याचे सांगितले. तसेच या विद्यालयास क्रीडासाहित्याची खोली आणि व्यायामशाळा मंजूर करुन देण्याची हमीही त्यांनी दिली. प्रास्ताविक, क्रीडाशिक्षक यशवंत गायकवाड यांनी केले. पारितोषिक वितरण समारंभाचे सूत्रसंचालन अमर वसावे यांनी, तर क्रीडा पारितोषिक वितरण समारंभाचे सूत्रसंचालन क्रीडाशिक्षिका सौ. सुनंदा जाधव यांनी केले. मुख्य कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. गौरी पवार यांनी केले. शालाप्रमुख सौ. शिवदास मॅडम यांनी उपस्थितांचे आभार मानले. हातकणंगले, सदाशिवगडचे संघ राज्यात प्रथम