Breaking News

जनतेच्या अडचणी सोडविण्याची राज्यकर्त्यांची मानासिकता हवी- विखे


कोपरगाव /श.प्रतिनिधी: सर्वसामान्य जनतेच्या अडीअडचणी सोडविण्याची मानसिकता राज्यकर्त्यांजवळ असेल तरच त्या सोडविल्या जावू शकतात. जिल्हा परिषदेच्या माध्यमातूनआम्ही हेच काम करीत असून त्यासाठी पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील व पद्मभूषण बाळासाहेब विखे ल यांचे संस्कार आम्हाला मिळालेले आहेत असेप्रतिपादन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनी विखे यांनी संवत्सर येथील कार्यक्रमात केले.
कोपरगांव तालुक्यातील संवत्सर येथे जिल्हा परिषद व पंचायत समिती स्तरावरील तसेच जिल्हा नियोजन समिती अंतर्गत सुमारे २ कोटी ९८ लाख ९० हजारखर्चाच्या विविध विकास कामांचा शुभारंभ व लोकार्पण सोहळा विखे यांच्या हस्ते पार पडला. त्याप्रसंगी आयोजित सभेत त्या बोलत होत्या. यावेळी सरपंच वनितामेहेत्रे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. यावेळी पं. स. माजी सदस्य कृष्णराव परजणे, उपसरपंच विवेक परजणे, जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकामविभागाचे कार्यकारी अभियंता अर्जुनराव आंधळे, गटविकास अधिकारी कपिलनाथ कलोडे, गट शिक्षणाधिकारी शबाना शेख, सहाय्यक गटविकास अधिकारी महेशवळवी, पशुसंवर्धन विकास अधिकारी डॉ. दिलीप दहे आदी उपस्थित होते.

संवत्सर ग्रामपंचायतीच्या नवीन इमारतीच्या भूमीपूजनाबरोबरच जिल्हा परिषद स्तरावरील परिसरातील वाड्या वस्त्यांवरील रस्त्यांचे खडीकरण,डांबरीकरण, अंगणवाडी इमारती, पाणी पुरवठा वितरण व्यवस्था, विहीर, बंधारा दुरुस्ती, नाले दुरुस्ती अशी सुमारे १ कोटी ५६ लाख १८ हजाराहून अधिक खर्चाचीकामे तसेच ग्रामपंचायत स्तरावरील नवीन विहीर खोदकाम, पाणी पुरवठा, जिल्हा परिषद शाळा, अंगणवाड्यांना शालेय साहित्याचे वितरण, पाणी पुरवठ्यासाठीपाईप लाईन, मातंग वस्तीमधील पाणी पुरवठा, नळांना मिटर बसविणे, स्मशानभूमीची दुरुस्ती, शाळांसाठी शौचालयाची व्यवस्था वाड्या वस्त्यांवर रस्ते अशीसुमारे ९३ लाख २७ हजाराहून अधिक खर्चाची कामे तर प्रस्तावित असलेल्या सुमारे ४८ लाख ४३ हजाराहून अधिक खर्चाच्या कामांचा शुभारंभ व लोकार्पण सोहळायाप्रसंगी पार पडला.