Breaking News

महाशिवरात्री महोत्सवात अभंगवाणीची बरसात


सातारा (प्रतिनिधी) : येथील श्री नटराज मंदीराच्या महारुद्र, महाशिवरात्री संगीत व नृत्यमहोत्सवात परमपूज्य शंकराचार्य श्री चंद्रशेखरेंद्र सरस्वती महास्वामी कला मंदंीराच्या भव्य स्टेजवर शास्त्रीय व उपशास्त्रीय गायन कार्यंक़्रमात सातार्‍यातील गायिका सौै. अमृता साठे यांनी कार्यक्रमाची सुरवात मारुबिहाग रागातील रुपक तालातील बडा ख्याल .. पत राखले होे... या रचनेवर गायन करुन केली. त्यानंतर त्रितालातील .. जागो मै सारी रैन..ही बंदिश व त्याचेे बोल ऐकवत सर्वांना अचंबीत केले. 

मराठीतील ..शंभो शंकरा.. हे भगवान शिवशंकराची स्तुती असणारे गाणे सादर केले. तसेच देखो जिया बैचैन, शाम दरसन बिना.. सादर करताना आपल्या गान साधनेची ओळखच उपस्थितांना करुन देत प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला.
 
संगीत सुवर्णतुला नाटकातील .. अंगणात पारिजात फुलला.. हे नाट्‌यपद सादर करुन सौ.साठे यांनी बिहाग रागातील एक तराणा सादर करुन .. देव भावाचा भूकेला..हा अभंग ऐकवताना उपस्थितांची मने तल्लीन झाली. संगीत स्वयंवर नाटकातील .. नाथ हा माझा.. सादर केली. तसेच संत नामदेव महाराजांनी रचलेली .. परब्रह्म निष्काम.. ही गवळण सादर करुन ..अगा वैकुंठीच्या राणा..या अभंगाने गायनाची सांगता केली. यावेळी अतिशय तोडीची तबला साथ शांताराम दयाळ,व संवादिनी साथ बाळासाहेब चव्हाण यांनी केली. या
वादन व गायनामध्ये सहभागी झालेल्या सौ.अमृता साठे, शांताराम दयाळ, बाळासाहेब चव्हाण या सर्व कलाकारांचा तसेच बाल चित्रकार अनुष्का तेलोरे, राजवर्धन माने, ओम जगदाळे, मधुरा तेलोरे या सर्वांचा सत्कार सातारा येथील ज्येष्ठ संगीत मार्गदर्शक अनील वाळींबे व ज्येष्ठ उद्योजक विलासचंद्र देवी यांचे हस्ते मानचिन्ह व प्रशस्तीपत्रे देवुन करण्यात आला.यावेळी नटराज मंदिराचे व्यवस्थापकिय विश्वस्त रमेश शानभाग, विश्वस्त नारायण राव,राहूल घायताडे,व्यवस्थापक चंद्रन,यश कोल्हापूरे,ऑचल घोरपडे, यांचेसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.