Breaking News

जीवनाचा खरा आनंद अध्यात्मातच -पोपटराव पवार


Image result for पोपटराव पवार

पारनेर/प्रतिनिधी
सध्याच्या धकाधकीच्या जीवनात भौतिक सुखामागे धावताना मनुष्य समाधान हरवून बसला आहे. जीवनाचा खरा आनंद हा अध्यात्मातच असल्याचे मत राज्याच्या आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी व्यक्त केले.

तालुक्यातील सारोळा अडवाई येथील वै.रामदास महाराज खोडदे यांच्या सात कोटी नामजप सप्ताहाचा प्रारंभ पवार यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठ चालक शिवाजी महाराज लामखडे, पारनेर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष देविदास आबूज, सेवा संस्थेचे अध्यक्ष बबनराव फंड, उपसरपंच संजय महांडूळे आदी. यावेळी उपस्थित होते.

पवार म्हणाले की, सुख दुःख, जात, धर्म या पलीकडे जावून विचार करणारा वारकरी सांप्रदाय आहे. या सांप्रदायाने मानवी मनाला आधार देण्याचे काम केल्याचे सांगत अध्यात्माला कृतीची जोड देण्याची आवश्यकता असल्याचेही पवार यांनी सांगितले. रामकृष्ण हरि या महामंत्राचा सात कोटी जप होणारा हा राज्यातील एकमेव सप्ताह असल्याचे सांगत पुढील वर्षी रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त संतसंमेलनाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे देविदास आबूज यांनी प्रास्ताविकात सांगितले.व्यासपीठ चालक पंढरीनाथ महाराज माने, माजी सरपंच डॉ. दतात्रय महांडूळे, प्रकाश म्हस्के, भानुदास खोडदे, संतोष आबूज, अंबादास महांडूळे, अनिल फंड, भाऊसाहेब शिंदे, मच्छिंद्र शिंदे, शिवाजीराव शिंदे आदी यावेळी उपस्थित होते.