भाजपमधून पुरूषोत्तम जाधवांची शिवसेनेत घरवापसी


मातोश्रीवर उध्दव ठाकरेंच्या हस्ते शिवबंधनात, सातारा लोकसभा मतदारसंघ शिवसेनेकडे ?कराड (विशाल पाटील)- भाजपाचे नेते पुरूषोत्तम जाधव यांनी आज मुंबई येथे मातोश्रीवर शिवसेनाप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत पाच वर्षांनी घरवापसी केली. त्यामुळे सातारा लोकसभा मतदारसंघ शिवसेनेला जाणार असल्याचे संकेत स्पष्ट झाले आहेत.
यावेळी परिवहन मंत्री दिवाकर रावते, पशुसंवर्धन मंत्री अर्जुनराव खोतकर, शिवसेना सचिव खा. अनिल देसाई, मिलिंद नार्वेकर, उपनेते व संपर्क प्रमुख नितीन बानुगडे- पाटील यांच्या उपस्थित पुरूषोत्तम जाधव यांनी प्रवेश केला. लोकसेभेचे २००९ चे शिवसेनेचे उमेदवार पुरूषोत्तम जाधव यांनी २०१४ मध्ये साताराची जागा आरपीआय पक्षाला दिल्याने नाराज होवून त्यांनी सोडचिठ्ठी दिली होती. त्यानंतर त्यांनी २०१४ ला अपक्ष निवडणूक लढवून १ लाख ५५ हजार ९३७ अशी जिल्ह्यात दोन नंबरची तर अपक्ष उमेदवार म्हणून देशात एक नंबरची मते मिळविली होती. तर २००९ साली खासदार छ. उदयनराजे भोसले यांच्या विरोधात २ लाख ३५ हजार ६८ मते मिळविली होती. त्यामुळे उदयनराजे यांच्या विरोधात पुरूषोत्तम जाधव हे समीकरण निश्चित मानले जात होते. मात्र ते कोणत्या पक्षातून की अपक्ष हे निश्चित होत नव्हते.

पुरूषोत्तम जाधव यांनी गेल्या काही दिवसांपासून जिल्हा पिंजून काढण्याचे काम हाती घेतले होते. त्यावेळी त्यांनी स्पष्ट केले होते. लोकसभा निवडणूक लढविणार हे नक्की, मात्र पक्षातून कि अपक्ष हे केवळ बाकी होते. गेल्या काही दिवसांपासून भाजप, आरपीआय व शिवसेना यांच्यात मतदारसंघावर दावा सांगितला जात होता. सातारा हा पूर्वीपासून शिवसेनेकडे होता मात्र २०१४ मध्ये आरपीआय मित्रपक्षाला दिल्याने सध्या चांगलाच तिढा निर्माण झाला आहे. त्यातच आज मातोश्रीवर पुरूषोत्तम जाधव यांनी भाजपमधून पुन्हा शिवसेनेत प्रवेश केल्याने हा मतदारसंघ शिवसेनेकडे जाणार हे निश्चित मानले जात आहे.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget